सांजवर्ता ऑनलाईन
नाशिक – ‘मनुस्मृतीला विरोध केला
तर तुमचाही दाभोलकर – पानसरे करु’ असे धमकीचे पत्र छगन भुजबळ यांना मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ
यांच्या ‘भुजबळ फार्म’ येथे आलेल्या निनावी पत्रातून त्यांना ठार मारण्याची धमकी
देण्यात आली आहे.
भुजबळांना धमकीचे पत्र
मिळाल्यानंतर त्यांच्या भुजबळ फार्म येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या
कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. अंधश्रद्धा निर्मुलन आणि पुरोगामी विचारांचा
प्रचार करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात तर कॉम्रेड गोविंद पानसरे यांची
कोल्हापूरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे
नेते छगन भुजबळ यांनी नागपूरमध्ये केलेल्या भाषणात, 'आम्हाला मनुस्मृती नको, डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय संविधान हवे.' असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्या
नाशिकमधील फार्म हाऊसवर रविवारी निनावी पत्राद्वारे मनुस्मृतीला विरोध केला तर
तुम्हाला ठार मारले जाईल, असे पत्र आले आहे.
निनावी पत्र
पाठवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करुन त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी राष्ट्रवादी
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
















